पुणे महापालिकेचे मुख्य अभियंता पाणीपुरवठा श्री जगताप साहेब यांना समाविष्ट गावे व पूर्वावेली दौंड बारामती इंदापूर येथील कृषी उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देताना विठ्ठल राजे पवार व मयूर गुजर…


पुणे पहाट वृत्तसेवा, कृपया दिनांक 06 जुलै 2024.

पुणे महापालिकेचे चौदा टीएमसी पाणी नेमके कुठे मुरतेय, शेतकरी संघटनेचा आरोप.!

इंदापूर दौंड पूर्व हवेली शेतीसाठीचे 14 टीएमसी पाण्यावर पुणे मनपाने डल्ला मारुनही समाविष्ट गावातील जनता तहानलेली..,

[ पुणे शहराला पाणीपुरवठा देण्याबाबत संघटनेचा विरोध नाही परंतु पुणे महानगरपालिकेने खडकवासला धरण साखळीतील शेतीसाठीच्या दहा टीएमसी पाण्यावर डल्ला मारू नये पुणे शहरालगत समाविष्ट गाव हे तहानलेले आहेत, त्यांना दोन दिवसाआड पाणीपुरवठा होतो कधी होतंही नाही, मग पुणे महानगरपालिकेचे वाढीव दहा टीएमसी पाणी कुठे मुर्ते आहे! याचे उच्चस्तरीय ऑडिट चौकशी होणे आवश्यक आहे, खडकवासला धरण साखळीतील 29.53 टीएमसी पाण्यापैकी पंधरा-सोळा टीएमसी पाणी हे पूर्व हवेली दौंड इंदापूर या महत्त्वा तीन तालुक्यातील शेतीसाठी होते पण त्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी न मिळाल्याने त्यांच्या पिकाचे हजारो कोटी रुपयाचे आर्थिक नुकसान केल्याने पुणे महापालिके विरोधात न्यायालयात दाद मागणार, विठ्ठलदादा राजे पवार.]दिनांक 06 जुलै 2024.
पुणे जिल्ह्यातील पूर्व हवेली, दौंड व इंदापूर , बारामती उत्तर तालुक्यातील उर्वरित 23 गावांसाठी शेतकऱ्यांना खडकवासला धरण साखळीतील मिळणारे सुमारे 12 ते 14 टीएमसी पाणी पुणे महापालिकेने बेकायदेशीर रित्या पळवल्याने गेल्या 24वीस वर्षांमध्ये तीन तालुक्यातील हजारो हेक्टर जमिनीवरील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे आर्थिक नुकसान पुणे महापालिकेच्या मुळे झाल्याने देशाची व राज्याची अन्नसुरक्षा जी कमी झाली त्याला पुणे महानगरपालिकेचा पाणी वाटप करार जबाबदार असल्याचा आरोप शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेने केला आहे.
विठ्ठलराजे पवार पुढे म्हणाले की पुणे महानगरपालिकेतील पाणी वाटपात व टँकर घोटाळ्यामध्ये असणारा अंदाधुंदी कारभार त्याला जबाबदार असल्याने पाणीपुरवठा व मल निसारण तसेच मुळा मुठा नदी प्रदूषित करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये कंटेंट टॉप कोर्ट दाखल करून पुणे जिल्ह्यातील पूर्व हवेली इंदापूर दौंड बारामतीचा उर्वरित 23 गावातील शेतकऱ्यांचे झालेल्या हजारो कोटी रुपयांच्या आर्थिक नुकसान भरपाईची मागणी करणार असल्याची माहिती शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रक विठ्ठल राजे पवार यांनी आज पुणे महानगरपालिका येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते आज पुणे महानगरपालिका आयुक्त यांची भेट घेण्यासाठी आले होते मात्र पुणे महापालिकेचे सक्षम आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले हे संघटनेचे पदाधिकारी पोहोचण्याच्या अगोदर दहा मिनिट पहिले पसार झाल्याने विठ्ठल राजे पवार, मयूर गुजर यांनी संताप व्यक्त केला व त्यांनी नंतर पुणे महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता जगताप साहेब यांची भेट घेतली यावेळी त्यांचे समावेत शेतकरी संघटना व मराठा महासंघ व संघटनेचे पुणे शहर जिल्हा अध्यक्ष मयूर गुजर, संघटनेच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष किरण डोळस व बाळासाहेब वर्पे महेश गिरी, युवक अध्यक्ष अनिल, रवीराणा पवार, राजू चौधरी आदी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी विठ्ठल राजे पवार म्हणाले की 1999 पासून पुणे महानगरपालिकेशी शेती पाणी वाटपाच्या संदर्भामध्ये सातत्याने पत्रव्यवहार सुरू आहे, त्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या दैनंदिन पाणी मागणीमध्ये सातत्याने वाढ झाल्याने पुणे खडकवासला धरण साखळी मधील 29.53% इतका पाणीसाठ्यात कोणती वाढ नसताना त्यामधून शेतीसाठी सुमारे 12 ते 16 टीएमसी पाणी हे पुणे जिल्ह्यातील पूर्व हवेली इंदापूर दौंड या तालुक्यांतील प्रथम प्राधान्य केवळ शेतीसाठी उपलब्ध होत होते, मात्र पुणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात सातत्याने नागरीकरणात वाढ झाल्याने पर्यायाने पुणे महानगरपालिकेला अतिरिक्त पाण्याची आवश्यकता लागल्याने पुणे महापालिका शेतकऱ्यांच्या शेतीचे पाणी वापरते आहे व ते पूर्व हवेली दोन इंदापूर बारामती तालुक्यातील उत्तरेतील पूर्व 23 गावांवर सातत्याने अन्याय करत आहे त्यामुळे शेतकर्यांच्या शेतीचे अर्थकारणावर मोठा आर्थिक परिणाम झाला आहे, सदर बाबत शेतकरी संघटनेने केलेल्या सततच्या पत्र व्यवहारानंतर, पुणे महापालिका वापरत असलेल्या त्या पाण्याच्या बदल्यात पुणे महानगरपालिकेने वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून ते साडे सहा 6.5 टीएमसी पाणी हे किमान शंभर टक्के ईटीपी प्रकीयेद्वारे शुद्धीकरण करून शेतीसाठी देण्याचा करार असताना तो गेल्या 24 वर्षापासून पुणे महानगरपालिकेने जाणवपूर्वक पाळला जात नसल्याने यामध्ये राज्यकर्त्यांसोबतच पुणे महानगरपालिकेचे आयुक्त पाणीपुरवठा व मल निसारण विभाग मनपा अधिकारी पदाधिकार तितकेच जबाबदार असल्याने संबंधितांच्या विरोधात, पाणी वाटप कराराच्या अटी व शर्तीचा अवमान केल्याने व अटी शर्ती न पाळल्यामुळे शेतकऱ्यांचे व शेतीचे कोट्यावधी रुपयाचे नुकसानीस व वेळेत पाणी न मिळाल्याने ती पिके घेता आली नाही त्यामुळे वरील तालुक्यातील शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा वाढला त्याला पुणे महानगरपालिकेतील आयुक्त व पाणी मला निस्सारण विभाग जबाबदार असल्याने त्यांच्यावर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट दाखल करू असा इशारा आज विठ्ठल राजे पवार यांनी महापालिकेचे मुख्य अभियंता जगताप यांना दिला आहे . राजे पवार म्हणाले की पुणे महापालिकेने आठ दिवसाच्या आठ पुणे शहरा लगतच्या नवीन गावांना दैनंदिन प्रत्येक दिवशी एक टाईम नळ पाणीपुरवठा व्यवस्थितपणे सुरू न केल्यास पुणे महानगरपालिके वर सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितच धोका निर्माण करून सर्वसामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वेठीस धरून त्यांचा छळ केल्याने त्यांना वेठीस धरल्याने पुणे महापालिका आयुक्त संबंधित प्रशासनाच्या विरोधात सर्वसामान्य नागरिकांना पुरवल्या जाणाऱ्या जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत नागरिकांना वेठीस धरल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू तसेच गेल्या 24 वर्षांमध्ये पुणे जिल्ह्यातील दौंड पूर्व हवेली इंदापूर बारामतीच्या उत्तरेच्या 23 गावांतील शेतकऱ्यांच्या शेती पिकाच्या पाण्यामुळे आर्थिक नुकसान केल्याने महापालिकेच्या आयुक्त मुख्य पाणीपुरवठा इंजिनियर मला निस्सारण विभाग प्रमुख, आयुक्त, उपायुक्त संबंधित अधिकारी यांच्या विरोधात प्रचंड स्वरूपाचा पुणे महापालिकेवर आसूड मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य, अखिल भारतीय मराठा महासंघ, मराठा सेवा संघ, शेतकरी कष्टकरी कामगार सहकार बचाव आंदोलन, शेतकरी किसान मोर्चा, महिला व कामगार किसान संघटन च्या माध्यमातून काढला जाईल असा इशारा आज विठ्ठलदादा राजे पवार यांनी पुणे महापालिकेचे मुख्य अभियंता यांना आज दिनांक १ जुलै रोजी कृषी दिनानिमित्त भेट घेऊन समक्ष दिला आहे. यावेळी मुख्य अभियंता जगताप यांनी आम्ही याबाबत तातडीने उपाययोजना करू, तसेच जुन्या कॅनाल ची कॅपॅसिटी वाढवण्याच्या संदर्भात चर्चा झाली शेतकऱ्यांना शंभर टक्के शुद्धीकरण करून पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन मुख्य अभियंता जगताप दिले आहे, तसेच यावेळी पुणे महापालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले त्यांचे कार्यालयात उपस्थित नसल्याने संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रिय विभागाकडे निवेदन तीव्र नाराजी व्यक्त केली, आज दिलेले निवेदन पुणे महापालिका आयुक्त व मुख्य अभियंत पाणीपुरवठा श्री जगताप पुणे महापालिका पाणीपुरवठा यांना लेखी दिले असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक व संघटनेच्या महा ऍग्रो चे चेअरमन तसेच एनयूबीसीचे वेस्टर्न भारताचे अध्यक्ष विठ्ठल राजे पवार व संघटनेचे प्रसिद्धीप्रमुख भाग्यवंत नायकुडे यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *