मौजे लालपुरी(कळंब) येथे माती परिक्षण संपन्न


पुणेरी पहाट वृत्तसेवा पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रतिनिधी धनाजी शेंडगे दि-४/७/२०२४ – मौजे लालपुरी (कंळब), ता इंदापूर , जि. पुणेः- “डॉ. शरदचंद्र पवार कृषि महाविद्यालय ,बारामती” चे विद्यार्थी “रावे“ या उपक्रमा अंतर्गत विविध उपक्रम करत असून, त्याचाच एक भाग म्हणून “मौजे लालपुरी (कळंब)” या गावात “माती परिक्षणाचे प्रात्यक्षिक” घेण्यात आले. शेतातील उत्पादनाचे प्रमाण अधीकाधिक वाढवण्यासाठी “माती परिक्षण ” हे अत्यंत महत्वाचे असते, त्यामुळे शेतकऱ्याला त्याच्या मातीतील पोषक घटकांसदर्भात माहिती मिळते, जमिनीची सध्याची स्थिती समजते. यासाठीच गावात आलेल्या “बारामती अॅग्रीकल्चरच्या कॉलेजच्या” कृषीदुतांनी शेतकऱ्यांना ‘माती परिक्षणाबद्दलची माहिती दिली, माती परिक्षण कसे करावे यांसदर्भातचे प्रशिक्षण सुदक्षा घेण्यात आले. माती परिक्षणाचे फायदे काय? ,यामुळे शेतीची गुणवत्ता कशी सुधारते? यांसदर्भात माहितीसुदधा शेतकयांना देण्यात आली. तसेच माती परिक्षणाचा अधिकाधिक फायदा कसा होईय, याचे महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे नमुने परिक्षणासाठी जवळच असलेल्या “कृषी विज्ञान केंद्र, बारामती” येथे पाठवून देण्यात आले. या उपक्रमास गावातील शेतकरी बांधवांसह, गावातील प्रतिष्ठित लोकांची ही हजेरी होती. तसेच हा उपक्रम पार पाडण्यासाठी गावातील लोकांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच या उपक्रमातून शेतकऱ्यांना नवनवीन गोष्टी शिकण्यास मिळाल्याबदल, त्यांचा उत्स्फूर्त अश्या प्रतिक्रिया मिळाल्या. शेतकऱ्यांना ‘माती परिक्षणाचे” फायदे समजले, तसेच यातून मातीची सुपीकता आणि आरोग्य कसे वाढेल याची माहिती मिळाली. या उप‌क्रमाचे नियोजन “डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयाचे” कृषीदूत- ओम पवार, लक्ष्मीकांत माळवे, सुमेध चौरे, अवधूत कांबळे, श्रीनिवास पाटिल, विशाल पवार, सुमित चव्हाण, सूरज जगताप यांच्याकडून करण्यात आले होते. तसेच गावातील श्री.पप्पू अर्जुन-पाटिल, श्री.राहुल अर्जुन-पाटिल या शेतकऱ्यांनी सहकार्य केले. तसेच या उपक्रमाबद्दल ‘ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे अधिकारी प्रा. एस. पी. गायकवाड, प्रा.एस. व्ही. बुरूंगले आणि प्रा. आर.डी. गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *