ग्रामीण भागात कबड्डी स्पर्धेचे आयोजन ,,,,


ग्रामीण भागात कबड्डी स्पर्धेचे आयोजन पळसदेव वालचंदनगर 

पुणेरी पहाट वृत्तसेवा पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रतिनिधी धनाजी शेंडगे पळसदेव तालुका इंदापूर येथे एस बी स्पोर्ट शिंदे वस्ती येथे दिनांक 22 जून ते 23 जून या दरम्यान जिल्हास्तरीय पंच परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नारायण काळे बोलत होते. इंदापूर तालुक्यात तब्बल दहा वर्षानंतर प्रथमच ग्रामीण भागात जिल्हास्तरीय कबड्डी पंच परीक्षा आयोजित करण्यात आली होती . या वेळी इंदापूर ,बारामती ,दौंड ,पुरंदर ,शिरूर , भोर या तालुक्यातून परीक्षेसाठी पंच उपस्थित होते.या वेळी सुमारे 35 पंचांनी परीक्षा दिली.असल्याची माहिती एसबी स्पोर्ट चे अध्यक्ष सागर बनसुडे यांनी दिली. जिल्हास्तरीय पंच परीक्षेसाठी पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन जाॅईन सेक्रेटरी संदीप पायगुडे , कार्यवाह योगेश यादव , राष्ट्रीय पंच नंदकुमार काळोखे , नारायण काळे , राज्य उत्पादन शुल्क माजी निरीक्षक तानाजी शिंदे ,पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन सदस्य सतपाल गावडे , शंभु भोपळे , चंद्रकांत रणवरे एसबी स्पोर्ट चे अध्यक्ष सागर बनसुडे , रुपेश भालेराव विलास शेलार सह कबड्डी प्रशिक्षक उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *