सोलापूर, सातारा, पुणे, जिल्ह्यातून माजी सैनिक, विविध पक्ष व संघटना पदाधिकारी, डॉक्टर्स, वकिल संघटना, प्राचार्य, पंचक्रोशितील ग्रामपंचायत सरपंच, सदस्यांसह असंख्य युवकांनी वीरचक्र व पुष्पहार अर्पण करुन वीरयोध्यास अभिवादन केले.


पुणेरी पहाट वृत्तसेवा सोलापूर, , निरा नरसिंहपुर :दिनांक-24, प्रतिनिधी :डॉक्टर सिद्धार्थ सरवदे . पुणे जिल्ह्यातील वालचंदनगर स्थित डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथील ‘ प्रेरणा भूमी ‘ मधे लोकनायक राजदत्त (आबासाहेब) उबाळे यांना त्यांच्या 23 व्या स्मृतिदिनी सर्व पंचक्रोशीतील समाज बांधवांसह पुणे, सातारा, सोलापूर या प्रमुख जिल्ह्यातील विविध समाजातील कार्यकर्त्यांनी व युवकांनी वीरयोध्यास विनम्र असे अभिवादन केले. विविध समाजातील कार्यकर्ता व पदाधिकारी सकाळी 6 वाजले पासून दिवसभर लोकनायक राजदत्त उबाळे यांच्या प्रेरणा भुमीस अभिवादन करुन पुढील वाटचालीस क्रांतिकारक व सकारात्मक ऊर्जा घेऊन जात आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की आपल्या चांगल्या सामाजिक चळवळीच्या कामामुळे व निस्वार्थ नेतृत्वाच्या जोरावर विविध समाजाला क्षणार्धात आपलस करणारे व अबाल-वृध्दांमधे जिव्हाळा निर्माण करणारे नेतृत्व म्हणजे वालचंदनगर मधील दिवंगत अपक्ष पंचायत समिती सदस्य लोकनायक राजदत्त ऊर्फ आबासाहेब उबाळे यांच्या 23 व्या स्मृतीदिनानिमित्त इंदापूर तालुक्यातील वालचंदनगरमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे “प्रेरणा भूमीत” यांना क्रांतिकारक वातावरणात अभिवादन केले गेले. यावेळी आंबेडकर उद्यानमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास जेष्ठ नागरिक व माजी सैनिक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उपस्थित जनसमुदायाने सामुहीक त्रिसरण पंचशिल ग्रहण केले व तथागत गौतम बुध्दांना वंदन केले. तद्नंतर उपस्थितांमधील काहिनी आबासाहेब यांच्या बदद्ल आपल्या आठवणींना उजाळा देत गतकालीन गोष्टी कथन केल्या. दिवंगत आबासाहेब उबाळे यांना मानणारा व जानणारा वर्ग सर्व जाती धर्माचे लोकांमधे मोठ्या संखेने होता व आहे, यानंतर लोकनायक राजदत्त उबाळे यांच्या प्रतिमेस विविध संघटना, पक्षाच्या पदाधिकारी यांनी पुष्पहार अर्पण करुन माजी सैनिक यांच्या हस्ते वीरयोध्यास वीरचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी इंदापूर तालुक्याचे विविध पक्ष व संघटना चे पदाधिकारी हे सकाळी अभिवादन करुन उबाळे कुटूंबियांना भेटून गेले, त्याचबरोबर सोलापूर, सातारा, पुणे, जिल्ह्यातून माजी सैनिक, विविध पक्ष व संघटना पदाधिकारी, डॉक्टर्स, बारामती वकिल संघटनेचे पदाधिकारी , इंदापूर येथील वकील,विविध शाळा-कॉलेजचे प्राचार्य, विविध वृत्तपत्रांचे संपादक-पत्रकार, पंचक्रोशितील ग्रामपंचायत सरपंच, सदस्यांसह असंख्य युवकांनी याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या लाडक्या लोकनेत्यास क्रांतिकारक वातावरणामधे विनम्रपणे अभिवादन करुन एक क्रांतिकारक ऊर्जा घेऊन गेले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *