इंदापूर येथे शासकीय सेवेत निवडीबद्दल युवक-युवतींचा सत्कार…….


  • इंदापूर येथे शासकीय सेवेत निवडीबद्दल युवक-युवतींचा सत्कार……..

पश्चिम महाराष्ट्रा विभाग प्रतिनिधी धनाजी शेंडगे

दि.22/3/24

               इंदापूर येथे हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते तालुक्यातील शासकीय सेवेत निवड झालेल्या युवक युवतींचा सत्कार करण्यात आला. सदर प्रसंगी शुभेच्छा व्यक्त करताना हर्षवर्धन पाटील बोलत होते.
   यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सागर मुळीक उपजिल्हाधिकारीपदी, केतकी वाघमोडे तहसीलदारपदी, सोनाली गायकवाड ग्रामीण महसूल अधिकारीपदी, पुनम झगडे सहाय्यक बी.डी.ओ.पदी, परिणीती शेंडे वनरक्षकपदी, मनल मोहिते सहाय्यक अभियंतापदी, प्रीती म्हेत्रे कनिष्ठ अभियंतापदी, साक्षी सपकळ वनरक्षकपदी, बालाजी पाटील शिक्षणाधिकारीपदी या सर्वांचा निवडीबद्दल सत्कार करण्यात आला.
  हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, प्रशासकीय सेवेत काम करताना चुकीचे काम करू नका, आपल्या पदाचा वापर करून कायद्याच्या चौकटीमध्ये राहून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम करा त्यातून मानसिक समाधान मिळते. वरिष्ठांचे आपले बद्दल चांगले मत राहील असे काम करावे व आई-वडील, आपले कुटुंब, नातेवाईक, मित्रमंडळी यांना कधी विसरू नका, असा मोलाचा सल्लाही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिला. यावेळी निवड झालेल्या युवक युवतींचे आई-वडील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *