रोखठोक न्यूज मीडिया पाचव्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय गुणीजन गौरव पुरस्कार सोहळा संपन्न….


रोखठोक न्यूज मीडिया पाचव्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय गुणीजन गौरव पुरस्कार सोहळा संपन्न….

पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रतिनिधी धनाजी शेंडगे

विविध क्षेत्रातील मान्यवराना गुणीजन गौरव पुरस्कार प्रदान

प्रतिनिधी – रोखठोक न्यूज मीडियाच्या पाचव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सामाजिक, शैक्षणिक, सहकार, उद्योग, कृषी, साहित्य, कला, क्रीडा, आरोग्य, पत्रकार व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या गुणीजन गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन सोमवार दि. १९/२/२०२४ रोजी सकाळी ११ वाजता महालिंगेश्वर विद्यालय खुडूस ता. माळशिरस येथे करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नारायण पवार माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व राजू चौरे मुख्याध्यापक,मकरंद साठे संपादक यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .

रोखठोक न्युज यांच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या मान्यवरांना पोलिस निरीक्षक नारायण पवार यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील व्यक्तींना समाजरत्न, आदर्श वस्ताद, लोकसेवा लोकसेवा कार्य गौरव पुरस्कार,वैद्यकीय अधिकारी कार्य गौरव पुरस्कार ,आदर्श सरपंच पुरस्कार, आदर्श विधितज्ञ पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार व अन्य विविध प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना नारायण पवार म्हणाले, कोणताही माणूस कामामध्ये कितीही मग्न असला तरी त्याला वर्तमानपत्र वाचल्याशिवाय चैन पडत नाही. माळशिरस तालुक्यातील पत्रकारांनी सकारात्मक भूमिका मांडून समाजाचा, गावाचा, तालुक्याचा विकास साधण्याचा प्रयत्न करावा. चुकीच्या गोष्टीला चूक आहे असे म्हटलेच पाहिजे आज या रोखठोक न्यूज मीडिया ही सर्वसामान्य लोकांचा आधार आहे,तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या क्षेत्रात कार्य करत असताना समाजसेवा हीच ईश्वर सेवा मानून अनेकांना उभारी देण्याचे काम रोखठोक न्यूज मीडिया ने केले आहे असे ते म्हणाले.
प्रा.डॉ.सुनील लोखंडे पुरस्कार सत्काराला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, रोखठोक न्यूज मिडिया ने राज्यस्तरीय गुणीजणांना गौरव पुरस्कार देवून कामाची उमेद वाढवली आहे, भविष्यकाळात पदाधिकाऱ्यांनी,सामाजिक,वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी चांगले काम करावे असे मत व्यक्त केले. यावेळी सुभाष साठे सरपंच यांनी रोखठोक न्युज मीडिया च्या वतीने चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तींना सर्व सहकार्य केले जाते पत्रकारांनी देखील आपल्या लिखाणातून कोणाचे जीवन उध्वस्त होणार नाही यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे रोखठोक न्यूज मीडियाच्या वतीने देण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी रोखठोक न्यूज मीडियाने एक वेगळा आदर्श पत्रकार क्षेत्रात उमटविला आहे.रोखठोक न्यूज मीडिया ही सर्वसामान्य लोकांचा आधार आहे असल्याचे मत व्यक्त केले.यावेळी विविध क्षेत्रातील पुरस्काराचे मानकरी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले.
सूत्रसंचालन श्रीनिवास गोरवे सर व आभार रानबा गोरवे सर यांनी मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *