हर्षवर्धन पाटील व राजवर्धन पाटील यांनी शिवजयंती सोहळ्यात धरला लेझीमवर ठेका!


हर्षवर्धन पाटील व राजवर्धन पाटील यांनी शिवजयंती सोहळ्यात धरला लेझीमवर ठेका!

पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रतिनिधी धनाजी शेंडगे

दि.19/2/24
इंदापूर येथे शिवजयंती सोहळ्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व युवा नेते राजवर्धन पाटील यांनी हलगीच्या तालावर लेझीमचा ठेका धरला. यावेळी उत्कृष्टपणे लेझीम खेळत हर्षवर्धन पाटील व राजवर्धन पाटील यांनी लेझीम पथकातील इतर खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
सकल युवा शिवभक्त इंदापूर तालुका आयोजित इंदापूर कॉलेज समोरील पारंपारीक शिवजन्मोत्सव 2024 या शिवजयंती सोहळ्यास सोमवारी दि.19 उपस्थित राहत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व राजवर्धन पाटील यांनी छत्रपती शिवरायांना विनम्र अभिवादन केले. शिवजयंती म्हटले की लेझीम पथक आलेच. छत्रपती शिवरायांच्या काळापासून लेझीमचा खेळ आहे. लेझीम हा महाराष्ट्रीयन खेळ आहे. इंदापूरात या शिवजयंती सोहळ्यात सहभागी होत हर्षवर्धन पाटील व राजवर्धन पाटील यांनी लेझीम खेळत शिवजयंती सोहळ्याचा आनंद घेतला. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज हे आपणा सर्वांचे स्फूर्तीस्थान आहेत. युवा पिढीने शिवचरित्रापासून प्रेरणा घेऊन आयुष्य घडवावे, असे आवाहन यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *