“इंदापूर पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये सायबर सेक्युरिटी सेंटर फॉर एक्सलन्स स्थापन करणार -प्राचार्य डॉ.सुजय देशपांडे………….


“इंदापूर पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये सायबर सेक्युरिटी सेंटर फॉर एक्सलन्स स्थापन करणार -प्राचार्य डॉ.सुजय देशपांडे………….

पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रतिनिधी धनाजी शेंडगे

विद्या प्रतिष्ठान कॉलेज, इंदापूर येथे ,पंचायत समिती इंदापूर, इंदापूर पोलीस स्टेशन व पॉलिटेक्निक कॉलेज इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षा जागरूकता या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांनी महाविद्यालयात सायबर सेक्युरिटी सेंटर फॉर एक्सलन्स स्थापन करणार आहे अशी माहिती दिली. हि कार्यशाळा प्रामुख्याने इंदापूर तालुक्यातील शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांच्यासाठी आयोजित करण्यात आली होती . या कार्यशाळेचा उद्देश शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यामार्फत विद्यार्थी व जनमानसात सायबर क्राईम याविषयी जागरूकता निर्माण करणे असा आहे असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य देशपांडे सरांनी केले.
या कार्यशाळेस पंचायत समिती इंदापूर चे गटविकास अधिकारी श्री विजयकुमार परीट साहेब, इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सूर्यकांत कोकणे साहेब ,तसेच पर्वती पोलीस स्टेशन पुणे येथील पोलीस अधिकारी श्री. प्रसाद पोतदार साहेब, आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले . व तसेच या कार्यशाळेस पीएसआय राळेभात साहेब, पायोनियर बिजनेस ग्रुपचे फाउंडर श्री .राम कोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री परीट साहेब यांनी केले.
याप्रसंगी बोलताना त्यांनी सायबर सुरक्षा हा अतिशय अनोखा व स्तुत्य उपक्रम असून इंदापूर परिसरात हा उपक्रम राबवल्याबद्दल त्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य देशपांडे सरांचे कौतुक केले.
सायबर गुन्हे व कायदे या विषयावर बोलताना कोकणे साहेब यांनी सायबर गुन्हे कशा प्रकारे घडतात व सामान्य माणसाची फसवणूक कशाप्रकारे होते याविषयी माहिती दिली. सायबर शिकारी या विषयावर बोलताना सायबर क्राईमचे पोलीस अधिकारी पोतदार
साहेब यांनी सोशल मीडियाचा वापर करताना काय काळजी घ्यावी तसेच तरुण वर्ग सोशल मीडियाच्या कसा आहारी गेला असून त्याद्वारे कशा प्रकारे फसवणूक केली जाते याविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली .
या कार्यशाळाची रूपरेषा प्रा. सोमनाथ चिकणे यांनी सादर केली. सूत्रसंचालन प्रा.सोनाली काळे , तर आभार प्रा. सदानंद भुसे यांनी मानले. कार्यशाळेचे समन्वयक प्रा. संतोष देवकाते, अमोल जगताप ,अमोल भामरे व सायबर सेलचे इतर सदस्य यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यास मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमास इंदापूर परिसरातील शाळेमधील मुख्याध्यापक,शिक्षक वर्ग व तसेच पत्रकार बंधू भगिनी, विद्यार्थी व महाविद्यालयातील शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *