प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडच्या वतीने माता रमाईची जयंती उत्साहात साजरी


प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडच्या वतीने माता रमाईची जयंती उत्साहात साजरी

पुणेरी पहाट वृत्तसेवा प्रतिनिधी श्री प्रविण नलावडे
पुणे, पिंपरी चिंचवड : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने संघाच्या पिंपरी चिंचवड महीला शहराध्यक्षा व साप्ताहिक पालिका संदेशच्या संपादिका सौ मंदा संजय बनसोडे यांच्या पुढाकाराने दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी माता रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी माता रमाई, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले या राष्ट्रीय मातांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी उपायुक्त सुषमा शिंदे, टेलिकम्युनिकेशन विभागाच्या दूरध्वनी चालक विमल कांबळे, सामजिक कार्यकर्ते मारुती भापकार, ज्येष्ठ पत्रकार माधव सहस्रबुद्धे, ज्येष्ठ पत्रकार अजय कुलकर्णी, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी, पालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने माता रमाईची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केल्यामुळे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते- पाटील राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य सांस्कृतिक प्रमुख प्रशांत विलणकर, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे विनायक सोळसे, महेश जाधव, विशाल पवार, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ अडसूळ, अशोक इंगवले, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, युवा राज्याध्यक्ष डॉ. नितीन शिंदे, युवा कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरू, विदर्भ अध्यक्ष केशव सवळकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष चिंधे, कार्याध्यक्ष शशिकांत पोरे, संपर्क प्रमुख जय कराडे, मराठवाडा महिला अध्यक्षा सुमती व्याहाळकर, कार्याध्यक्ष हुकूमत मुलाणी, संपर्क प्रमुख आनंद भालेराव, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, संपर्क प्रमुख संतोष वाव्हळ, कोकण महिलाध्यक्षा दीपिकाताई चिपळूणकर, कोकण संघटक श्रीराम कदम, कोकण उपाध्यक्ष योगेश भामरे, कायदेविषयक सल्लागार ॲड. अमोल सकट, ॲड. गजेंद्र चंद्रे, ॲड. रत्नाकर पाटील, ॲड.जितेंद्र पाटील, ॲड परेश जाधव, राज्य सल्लागार प्राचार्य डॉ वसंत बिरादार, विठ्ठल शिंदे, महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष व तालुका पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *