संतांचा वारसा स्वामी गोविंदगिरी महाराजांनी पुढे चालवावा
संतांचा वारसा स्वामी गोविंदगिरी महाराजांनी पुढे चालवावा
पुणेरी पहाट वृत्तसेवा आळंदी प्रतिनिधी संजिव बगे आळंदी:- स्वामी गोविंद गिरी महाराजांचे अंतःकरण खूप विशाल आहे. राजकीय नेत्यांनी त्यांच्याकडून कसे बोलायचे हे शिकण्यासारखे आहे. कोविड काळातील त्यांची प्रवचने नागरिकांच्यात नव चैतन्य निर्माण करणारी ठरली. पूर्वीच्या संतांनी जे काम केले त्याचा समृद्ध वारसा आज स्वामी गोविंदगिरी महाराज चालवत आहेत. असे गौरवद्गार विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काल आळंदी येथे काढले. परमपूज्य गोविंददेव गिरी महाराज यांच्या अनुतमहोत्सवानिमित आयोजित गीताभक्ती संमेलनात सहभागी झाले असता त्या बोलत होत्या.