कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यामुळे नवले ब्रिज जवळ मोठा अपघात, अपघातात 40 ते 45 गाड्यांचे नुकसान…!


पुणे: प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )धायरी, ता. २० : नवले पूल येथील अपघाताची मालिका अद्यापही सुरू असून आज पुन्हा कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाला आहे सुमारे 40 ते 45 गाड्या एकमेकावर आदळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे, आणि त्यामध्ये सुमारे 40 ते 50 लोक जखमी झाले आहेत असेही सांगितले जात आहे, जखमींवर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटले आणि कंटेनरने 40 ते 45 गाड्यांना उडवुन् वाडगाव पुलाजवळ आदळला, यात सुमारे 40 ते 50 जण जखमी झाले आहेत, जखमींना खाजगी रुग्णालयात उपचार सुरू केले आहेत, अपघातस्थळी सिंहगड तसेच दत्तवाडी पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित झाले आहेत सुमारे 12 ते 15 रुग्णवाहिका देखील अपघातस्थळी आलेल्या आहेत, अपघात इतका भीषण होता की 40 ते 45 गाड्या एकमेकांवर आदळल्या, साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाताना सुमारे दोन ते तीन किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत परिणामी त्या भागात वाहतूक कोंडी देखील झालेली आहे, अग्निशमन दलाच्या 3,4 गाड्या ही अपघात स्थळी दाखल झाल्या आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *