पिंपरी-चिंचवड शहरातील (Jansanvad Sabha) रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम वेगाने करावे. रस्त्यांचे कामे तातडीने पूर्ण करावीत. शहर अभियंता संजय कुलकर्णी यांचे आदेश


पिंपरी चिंचवड प्रतिनिधी -वंदना जाधव – पिंपरी-चिंचवड शहरातील (Jansanvad Sabha) रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम वेगाने करावे. रस्त्यांचे कामे तातडीने पूर्ण करावीत. पदपथांवरील राडारोडा उचलावा, पदपथांवरील निघालेले पेव्हिंग ब्लॉक तात्काळ बसवावेत अशा विविध मागण्या आज (सोमवारी) झालेल्या जनसंवाद सभेमध्ये नागरिकांनी केल्या.महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आज झालेल्या जनसंवाद सभेत 88 नागरिकांनी सहभाग घेऊन तक्रारवजा सूचना मांडल्या. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे 17, 11, 7, 6, 9, 14, 15 आणि 9 इतक्या नागरिकांनी उपस्थित राहून आपले म्हणणे मांडले. अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे, समाज विकास विभागाचे उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर, आरोग्य विभागाचे उप आयुक्त अजय चारठाणकर, भूमी जिंदगी विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत जोशी यांनी भूषवले. तसेच क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी सोनम देशमुख, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, सीताराम बहुरे, शीतल वाकडे, विजयकुमार थोरात हे उपस्थित होते. क्षेत्रीय कार्यालयांतील जनसंवाद सभेत स्थापत्य, जलनिस्सारण, पाणीपुरवठा, विद्युत, नगररचना आदी विभागांचे कार्यकारी अभियंता, उद्यान, वैद्यकीय, आरोग्य, करसंकलन या विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *