पुणे सासवड रोडवर उरुळी देवाची येथे कंटेनर् व शिवशाही एस टी बस ची जोरदार धडक , एक प्रवासी ठार तर सात जण गंभीर जखमी…!
पुणे:प्रतिनिधी;( रमेश निकाळजे ); हडपसर जवळील उरुळी देवाची फाटा सासवड रोड येथे रविवारी मध्यरात्री कंटेनर व शिवशाही बस यांच्यामध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. दोघांची जोरदार धडक होऊन हा अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.याबाबत प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सासवड रस्त्यावर उरुळी फाट्यावर असलेल्या गोडाऊनमधून कंटेनर माल भरून निघाला होता. मात्र त्याचवेळी पुण्याच्या दिशेने जात असलेली शिवशाही एसटी बस वेगाने जात होती. त्यामुळे बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस कंटेनरला जाऊन जोरात धडकली. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे. ही बस पंढरपूरहून पुण्याच्या दिशेने जात होती. या एस टी बसचे स्पीड जास्त असेलतामुळे बसची धडक एवढ्या जोरात होती की बसचा पुढच्या भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. त्यामुळे या अपघातात एकाचा जगीच मृत्यू झाला आणि सात प्रवासी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व गाडीतील जखमींना बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघाताने काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. कारण कंटेनर ररस्त्यात पूर्ण आडवा झाला होता. हडपसर हे पुणे शहरातील मोठे उपनगर असल्यामुळें आजूबाजूला मोठ्या प्रमाणात प्लॉटिंग होऊन कंट्रक्षण ची कामे होऊन शहरातील तसेंच बाहेर गावची लोक मोठ्या प्रमाणात राहायला आलेली असल्यामुळे या भागात दिवसेंदिवस गर्दीचे तसेंच वाहनांचे प्रमाण वाढले आहे त्यात हा रस्ता पालखी मार्ग आहे त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढू लागले असून दर दोन दिवसांनी मोठा अपघात होत आहे. त्यामुळे यावर नियंत्रण आणण्यासाठी योग्य त्या उपाय योजना करणे गरजेचे असल्याचे जाणकार मंडळी सांगतात , या अपघातात कंटेनरचे देखील मोठे नुकसान झाले असून कंटेनर चालक जखमी झाला आहे.