इंदापूर बारामती तालुक्यातील खळबळजनक घटना जिल्हा परिषद शिपाई देतो मुक्या जनावरांना लम्पी स्कीनचे इंजेक्शन… तालुक्यातील माजी मंत्री, विरोधी पक्षनेते तालुक्याचे पशुवैद्यकीय डॉक्टर गेले कुठे.! विठ्ठल पवार राजे


पुणे प्रतिनिधी भिमराव कडाळे पाटील ———–*बारामती इंदापूर तालुक्यात पशुवैद्यकीय शिपाई संतोष खामगळ कडुन चक्क मुक्या जनावरांना लम्पिची लस!, मग पशुवैद्यकीय डॉक्टर गेले कुठं! पशुसंवर्धन आयुक्तांनी तात्काळ चौकशीचे आदेश देऊन इंदापूर बारामती तालुक्यातील बेजबाबदारपणे मुख्या जनावरांना इंजेक्शन मारणाऱ्या शिपायाला कायमचे काढून टाका तर गैरहजर पशुवैद्यकीय इंदापूर बारामती तालुका, डॉक्टरांवर कठोर व नोकरीतून काढून टाकण्याची कारवाई करा…**शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे विठ्ठल पवार राजे यांचा पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयावर तीव्र संताप*पुणे – राज्यातील लम्पी स्कीन रोगापासून पशुधनाला वाचविण्यासाठी शेतकऱ्यांवर अर्थिक संकट आणि दररोज होणारी तगमग पाहता शासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात उपाययोजना होत नसल्याचे दिसून येत नाही. त्यातच लंम्पी स्किनच्या शासकीय लशी खाजगी डॉक्टरांना विकून व प्रति पशुधन 10 ते 30 रुपयांची खंडणी उकळून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करणारी यंत्रणा बारामती इंदापूर तालुक्यात कार्यरत झालेली आहे बाबतची लेखी तक्रार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांनी परवा पशुसंवर्धन आयुक्त, उपायुक्त, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. संबंधित शिपही व अधिकारी व तालुका डॉक्टर कारवाई होत असताना आज शनिवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी बारामती इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद विभागातील पशुवैद्यकीय अधिकारी असल्याचे भासवुण संतोष खामगळ या शिपायाकडून चक्क मुक्या जनावरांना लस दिली जात असल्याचे निदर्शनास आल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. ची बाब जिल्हा परिषदेचे डॉक्टर शिवाजी विधाते यांचे कडून समजल्याची माहिती विठ्ठल पवार राजे यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे. त्यामुळे सदरचा प्रकार एकून शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल पवार राजे यांना धक्का बसला, बाबत त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. लम्पी स्कीन रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील पशुधनाला मोफत लसीकरणचे आदेश द्यावेत. अन्यथा जनावराना तहसील किंव्हा जिल्हाधिकारी कार्यालय सोडू बाबत आंदोलनाचा इशारा शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठलराव पवार राजे यांनी बुधवारी दिनांक 14 दिला असताना आज वरील गंभीर प्रकरण आढळून आले आहे. मुक्या जनावराला दिली जाणारी ही लस एका शिपायाकडून दिली जात असल्यामुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या पायाच्या आर्थिक नुकसानीस जबाबदार म्हणून होती विभागाचे तालुका पशुवैद्यकीय अधिकारी आणि पशुसंवर्धन आयुक्त यांना गंभीर परिणामास सामोरे जावे लागेल असा इशारा विठ्ठल पवार राजे यांनी दिला आहे. शेतकऱ्यांकडील किमान सव्वा ते दीड लाख रुपये मूल्यांची असणारी पशुधने अर्थातच आमची जनावरे जर चुकीच्या माणसाकडून इंजेक्शन देऊन दगा फटका झाला तर इंदापूर बारामती तालुका पशुवैद्यकीय विभागीय डॉक्टर अधिकारी जबाबदार राहतील का किंवा त्यांचे कडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई संबंधित डॉक्टर व अधिकाऱ्यांना देणे भाग पडेल असेही ते म्हणाले.तसेच लंबी स्कीन या आकस्मित आसमानी आणि सुलतानी संकटामुळे शेतकऱ्यांचे पशुधनाला विमा संरक्षण देण्याच्या संदर्भात राज्य सरकारच्या पशुवैद्यकीय विभागाचे आयुक्त सचिन्‍द्र प्रताप सिंह व मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी आदेश करावेत बाबत निवेदनात म्हटले आहे. महाराष्ट्र राज्यातील लम्पी स्कीन रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील पशुधनाला मोफत शेतकऱ्याच्या शेतावर बांधावर गैरानावर डोंगर खेड्यात या ठिकाणी पशुधन आहे त्या ठिकाणी लसीकरणाचे योग्यता प्राप्त पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अर्थातच पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून दिले जावेत असे अत्यंत तातडीचे आदेश द्यावेत. अन्यथा जनावराना तहसील किंव्हा जिल्हाधिकारी कार्यालय आणून सोडू बाबत लेखी निवेदनाद्वारे राज्य सर आंदोलनाचा इशारा देत आहोत. असेही त्यांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *