महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मागील काही दिवसापासून पाऊस पडत असल्याने खडकवासला धरणातून मुळा-मुठा नदीत ५० हजार कुसेक्स पेक्षा जास्त पाणी सोडल्याने नदीला आला पुर


पुणे: प्रतिनिधी;( रमेश निकाळजे ); महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मागील काही दिवसापासून पाऊस पडत असल्याने खडकवासला धरणातून मुळा-मुठा नदीत ५० हजार कुसेक्स पेक्षा जास्त पाणी सोडल्याने नदीला पूर आला आहे. या पूरामुळे मांजरी बुद्रुक व मांजरी खूर्द गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेला असून दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान पोलिसांनी पूलावरील वाहतूक बंद केली आहे. येथील मुळा-मुठा नदीवर काही वर्षांपूर्वी सबमर्शिबल पूल बांधलेला आहे.क्षमता नसतानाही सध्या या पूलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. हा पूल नगर व सोलापूर महामार्गांना जोडणारा आहे. त्यामुळे अवजड वाहनांसह इतर सर्वप्रकारची खासगी व सार्वजनिक वाहतूक येथून होत आहे. तुटलेले कठडे यामुळे वाहतूकीसाठी आगोदरच धोकादायक झालेला हा पूल पूरामुळे आणखीनच धोकादायक झाला आहे. रात्री आणि आज सकाळी व दुपारी टप्याटप्याने खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मांजरी बुद्रुक येथील पूल पाण्याखाली गेला आहे. सकाळी दहा वाजल्यापासून नदीपात्रात पाण्याची पातळी वाढत होती, त्यानंतर दुपारी पावणे चारच्या सुमारास पूलावरुन पाणी वाहयला सुरुवात झाली. पूर पाहण्यासाठी नदीच्या दोन्ही काठांवर बघ्यांची गर्दी जमली होती. पूराचा धोका आहे. प्रवाशांनी येथून प्रवास न करता वाघोली व थेऊर या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन पाठबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व पोलिसांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *