खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला: मुळामुठा नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा…!


पुणे: प्रतिनिधी; ( रमेश निकाळजे ) ; मागील दोन दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे पुण्यातील सर्वच धरणांमध्ये पाण्याची पातळी मोठ्याप्रमाणात वाढली असल्यामुळे धरणातून पाण्याच‍ विसर्ग २५ हजार क्युसेक्स ने वाढवण्यात आला आहे त्यामुळे मुळा मुठा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे सध्या हा प्रवाह २० हजार क्युसेक इतका आहे तो ३० हजारांवर जाण्याची शक्यता आहे अशी माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी दिली.बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्याच्या अनेक भागात गेल्या काही दिवसापासून जोरदार पाऊस पडत आहे. राज्यातील सर्व धरणे तुडूंब भरली आहेत त्यामुळेच सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत अनेक धरणातून विसर्ग वाढवण्यात आले आहेत् . पुण्याच्या वरील धरण भागात जोरदार पाऊस पडत असल्याने पाण्याची आवक वाढल्याने खडकवासला धरणातून आज २० ते २५ हजार क्युसेक्स् पाण्याचा विसर्ग चालू आहे त्यामुळे मुळा मुठा नदीला पूर आला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या मोटारी अगोदरच काढून घेतल्या आहेत.नदीकाठच्या लोकांना सावध राहण्याचे तसेच नदी पात्रात न जाण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *