पुणे हडपसर व आजूबाजूच्या परिसरात परतीच्या पावसाने जनजीवन विस्कळीत


पुणे: प्रतिनीधी ( रमेश निकाळजे ); हडपसर; परिसरात काल झालेल्या पावसाने हाहाकारच केला, परतीच्या पावसाने सायंकाळी पाच वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत दमदार हजेरी लावली ,परिसरातील उंड्री, पिसोळी, महंमदवाडी, औताडेवाडी, वडाचीवाडी, होळकरवाडी परिसरात जोराचा पाऊस झाल्याने ठिकठिकाणी पाणी साचले होते, त्यामुळे सर्वच ठिकाणी रस्त्यात पाणीच पाणी साठले होते तसेच ओढे व नाले पुराच्या पाण्याने ओसंडून वाहत होते रस्त्यात मोठे खड्डे पावसाच्या पाण्याने भरल्याने बऱ्याच दुचाकी गाड्यांचे अपघात झाले, तसेच चारचाकी चालकांनाही चांगलीच कसरत करावी लागली. सय्यदनगर रेल्वे गेटच्या बाजूचा रस्ता जलमय झाला होता. पावसाच्या पाण्यातून धोकादयक दुचाकीचालक वाहने चालवत होते, पादचारीही पाण्यातून वाट काढताना पाहायला मिळाले.सायंकाळी अचानक आलेल्या पावसामुळे फेरीवाले, भाजीपाला विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. हडपसर येथिल सय्यदनगर रेल्वेगेट- हांडेवाडी चौक रोडवर चिंतामणीनगर, श्रीराम चौक, भुजबळ चौक, सातव चौक आणि महंमदवाडी सय्यदनगर रेल्वेगेट रोडच्या दरम्यान जाधवमळा, वाडकरमडळा, आणिसय्यदनगर ठिकठिकाणी पाणी साचल्याने दुचाकीचालक आणि पादचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागल्याची तक्रार अनेक नागरिकांसह वाहनचालकांनी केली आहे.उंड्रीतील संस्कृती स्कूलजवळ बंदिस्त नाल्याचे काम सुरू असल्याने रस्ता पाण्याखाली गेला होता. त्यामुळे नागरिक अडकून पडले होते. पिसोळी, उंड्री, महंमदवाडी ओढा दुथडी भरून वाहत असल्याचे तेथील स्थानिक नागरिकांनी सांगितले. ओढा स्वच्छ केल्यामुळे पूरस्थिती टळली. उंड्री सय्यदनगर रेल्वेगेटजवळ पाण्यातून दुचाकी-पादचारी लोक वाट काढताना भर पावसात कसरत करतानाचे चित्र सगळीकडे पाहायला मिळत होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *