पुणे महानगरपालिकेतील सर्व कंत्राटी कामगारांना कळविण्यात येते की, कायम कामगारांना दरवर्षी 8.33% बोनस व सतरा हजार रुपये अनुदान दिवाळीपूर्वी देण्यात येणार


पुणे ग्रामीण प्रतिनिधी संजय कुलुत पु णे महानगरपालिकेतील सर्व कंत्राटी कामगारांना कळविण्यात येते की, कायम कामगारांना दरवर्षी 8.33% बोनस व सतरा हजार रुपये अनुदान दिवाळीपूर्वी देण्यात येते. मात्र अशा प्रकारे कंत्राटी कामगारांना कोणती रक्कम देण्यात येत नाही. हा कंत्राटी कामगारांवर घोर अन्याय आहे. या सर्व विरुद्ध आवाज उठवण्यासाठी आपण जनजागरण मोहीम सुरू केली आहे. त्याचप्रमाणे आपल्याला किमान वेतन कायद्यातील फरकाची रक्कम फेब्रुवारी 2015 ते फेब्रुवारी 2021 देणे बाकी आहे. ही मागणी करण्यासाठी व या संदर्भातली माहिती देण्यासाठी वेगवेगळ्या भागात बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे. 1)रविवार दिनांक 11 सप्टेंबर दुपारी तीन वाजता अण्णाभाऊ साठे सभागृह, पद्मावती. 2) दिनांक 12 सप्टेंबर दुपारी तीन वाजता पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन घोले रोड, पुणे.3) दिनांक १३ सप्टेंबर पु ल देशपांडे गार्डन, सिंहगड रोड, दुपारी तीन वाजता.4) दिनांक 14 सप्टेंबर महात्मा फुले सांस्कृतिक भवन, शिवरकर गार्डन शेजारी, दुपारी तीन वाजता 4) 15 सप्टेंबर महात्मा फुले वाडा कसबा, दुपारी तीन वाजता. याप्रमाणे बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीसाठी कंत्राटी सुरक्षा रक्षक, व्हेईकल डेपोचे चालक, स्मशानभूमीचे कर्मचारी, सफाई कर्मचारी, पाणीपुरवठा कर्मचारी व इतर सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे.कळावे आपला सुनील शिंदे अध्यक्ष राष्ट्रीय मजदूर संघ (RMS)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *