दहीहंडीच्या दिवशी यापुढे सार्वजनिक सुट्टी शिंदे सरकारचा महत्वपूर्ण निर्णय.


पुणे जिल्हा प्रतिनिधी संजय कुलुत. पुणे दहीहंडीच्या दिवशी यंदा राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे मुख्य सचिवांना याबाबतच्या सूचना देण्यात येतील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले मुंबईत हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो थरावर थर रचले जातात दहीहंडी फोडण्याच्या स्पर्धा घेतल्या जातात युवा वर्ग मोठ्या प्रमाणात यात सहभागी होतो प्रताप सरनाईक हे गेल्यावर्षपासून दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी यासाठी पाठपुरवठा करत होते यंदा त्यांच्या या निवेदनावर मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक निर्णय घेतला प्रताप सरनाईक यांची मागणी मान्य झाली आहे येत्या 18 ऑगस्टला कृष्ण जन्म आणि 19 ला गोपालकाला आहे दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली गेली दोन वर्षे कोरोनामुळे सणांवर बरीच निर्बंध होती आता हे सण धुमधडाक्यात साजरे करण्याचा मार्ग मोकळा झालाय यंदा अशाप्रकारे कुठलेही निर्बंध असणार नाहीत परंतु न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचं पालन करावे असे आव्हान मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे…..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *