पुण्यातील खचलेले रस्ते आणि खड्डे तातडीने दुरुस्त करा खड्ड्यांच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील ॲक्शन मोडवर. ‌‌


हेडलाईन …. पुण्यातील खचलेले रस्ते आणि खड्डे तातडीने दुरुस्त करा खड्ड्यांच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील ॲक्शन मोडवर. ‌‌. पुणे जिल्हा प्रतिनिधी संजय कुलूत. ‌ पुणे गेल्या आठवड्याभरात पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पावसामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे तर काही ठिकाणी रस्ते खचले असल्याचे दिसून येत आहे यासंदर्भात पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी पत्र लिहिले असून तातडीने रस्ते दुरुस्त करावेत अशी मागणी यांनी केली आहे गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे कोथरूड मतदार संघातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे याच प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज चौक मेल के नगर चौक राहुल नगर कर्वे रोड आशिष गार्डन चौक गुजर मस्तानी परिसर नॉन स्टॉप चौक पौड फाटा सदानंद हॉल समोरील बाजू चांदणी चौक आयटी पार्क समोर कोथरूड डेपो व पुणे शहरात बऱ्याच ठिकाणी रस्त्याचे दुरावस्था झालेली आहे मातोश्री घाटा जवळील रस्ता पौड रोड आनंदनगर समोरील बाजू या संवेद भागातील रस्ते मोठ्या प्रमाणात खचले आहेत राष्ट्रवादी पक्षांनी तर खड्ड्यात मासे सोडता आंदोलन केले होते तर मनसेने खड्ड्याची पूजा करून रांगोळी घालून आंदोलन केले गेले पाच वर्षे पुण्यात भाजपाची सत्ता होती त्यामुळे खड्ड्यात बाबतचा सगळं खापर-भाजपावर फोडलं जात आहे त्यात 90% खड्डे बुजवल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला होता मात्र हा दावा खोटा असल्याचं पुणे शहरातील राष्ट्रवादीच्या नेत्यांचे म्हणणं आहे चंद्रकांत पाटील यांच्या पत्रामुळे खड्डे मुक्त पुणे होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…….


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *