तामसा ता.हदगाव येथील 27 भीमसैनिक आंदोलक यांच्या सुटके संदर्भात ॲड.योगेश मोरे सर यांच्या मार्गदर्शनात नांदेड येथे बैठक संपन्न…


पुणे प्रतिनिधी भिमराव कडाळे पाटील तामसा ता.हदगाव येथील 27 भीमसैनिक आंदोलक यांच्या सुटके संदर्भात ॲड.योगेश मोरे सर यांच्या मार्गदर्शनात नांदेड येथे बैठक संपन्न…! नांदेड जिल्हा हा चळवळीचा केंद्र बिंदू असून नांदेड जिल्ह्यातील आंदोलक कार्यकर्त्यांवर ही वेळ येणं हे निषेधार्थ आहे .तामसा येथील आंदोलक भीमसैनिक यांना नांदेड जिल्हा सत्र न्यायालयाने जो निकाल दिला तो निकाल निषेधार्थ असून कायद्याचा अवमान होउ नये व पुढील प्रक्रिया करून आंदोलकांची सुटका व निर्दोष मुक्तता करण्यासंदर्भात मुंबईहून आलेले ॲड.मोरे सर यांनी मार्गदर्शन करण्यात आले. जो नांदेड न्यायालयाने 27 आंदोलक भीमसैनिक यांना 21000दंड व 05 वर्षाची सजा सुनावणी झाली त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र व आंबेडकरवादी समूहात हळहळ व्यक्त होत आहे ,त्यांच्या पाठीशी संपूर्ण पक्ष ,संघटना सोडून आंबेडकरवादी म्हणून सर्व सोबत आहेत .आंदोलकांच्या सुटकेसाठी वरिष्ठ अनुभवी वकिलांची टीम व वकील नेमण्यात येऊन लवकरात लवकर सुटकेसाठी प्रयत्न केल्या जातील या आशयाचे ॲड.मोरे यांनी सांगितले. वरिष्ठ पदाधिकारी यांनी आंदोलकांच्या सुटके संदर्भात आपले वयक्तिक मत मांडले . यावेळी जिल्ह्यातील प्रमुख आंबेडकरवादी समूह व तामसा येथील आंदोलक यांचे नातेवाईक उपस्थित होते .- सुरेश सावते जिल्हाध्यक्ष,नांदेड (ऑल इंडिया पँथर सेना)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *